चाळीसगाव हादरले : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार ; दोघांना अटक
चाळीसगाव : 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा नराधमांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पळवून नेवून बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे.
निर्जनस्थळी केला अत्याचार
16 वर्षीय शालेय अल्पवयीन तरुणीला पैश्याचे आमिष दाखवून मोटरसायकलवर बसवून करगाव रोड परीसरात निर्जनस्थळी नेण्यात आले व तेथे पडीत घरात नेऊन संशयीत आरोपी शेख सलिम शेख वजीर व हमीद बिरीम पिंजारी (सुवर्णाताई नगर, चाळीसगाव) यांनी तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार मुलीने आईला सांगितला. आईने नातेवाईकांना घेऊन शहर पोलीस ठाणे गाठले. महिला पोलीस कर्मचारी आणि दक्षता समिती सदस्या प्रतिभा पाटील यांच्या समोर तरुणीचे जाब जवाब नोंदवण्यात आले. तरूणीने आपबीबती कथन केल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघा आरोपींना अटक
पोलिसांनी घटनेची दखल घेत दोघा आरोपींना अटक केली. सोमवारी आरोपींना जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत.
