जळगावातील जखमी वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू
जळगाव : शहरातील वाल्मिक नगरात राहणार्या 60 वर्षीय वृध्दाचा पायी जात असतांना खाली पडून डोक्याला दुखापत झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रामचंद्र जयराम सोनवणे (60, रा.वाल्मिक नगर, आसोदा रोड, जळगाव) असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.
डोक्याला मार लागल्याने वृद्ध जखमी
रामचंद्र सोनवणे हे आपल्या परीवारासह वाल्मिक नगरात वास्तव्याला आहे. 14 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत पायी चालत असतांना त्यांचा तोल गेला व रोडवर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमोल विसपुते करीत आहेत.

