शेतकऱ्याच्या घरातून एक लाख दहा हजारांची रोकड लांबवली


चाळीसगाव : तालुक्यातील बोरखेड बु. येथील एका शेतकऱ्याच्या घरातील कपाटातून एक लाख दहा हजार रुपयांची रोकड अज्ञाताने लंपास केली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

घरफोडीमुळे उडाली खळबळ
तालुक्यातील बोरखेड ब्रु. येथील शेतकरी रविंद्र रामकृष्ण पाटील (४५) हे कुटुंबासह शेतात गेलेले असताना घरातील कपाटातून १ लाख दहा हजार रुपये रोकड अज्ञाताने लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीला आली आहे. दरम्यान, रविंद्र रामकृष्ण पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी शेतातील मक्का पिकांचे विक्री बाजारात केल्यामुळे त्याला १,१०,००० हजार रुपयांचे उत्पन्न झाले. त्यावर त्यांनी सदर पैसे हे घरातील कपाटातील लॉकर मध्ये ठेवून दिले व शनिवार रोजी नेहमीप्रमाणे परीवासह शेतात निघून गेला. तत्पूर्वी त्यांनी घराला कुलूप लावून चावी ही तुळशीत लपवून दिली. याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेली रोकड चोरून नेले. या घटनेने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. रविंद्र रामकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलिसात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !