जळगावात धूम स्टाईल मोबाईल चोरी : उच्चशिक्षीत चोरटे पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव : सिंधी कॉलनी ते गणेश कॉलनी परिसर अशा सुमारे तीन किलोमिटरची रपेटमध्ये दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी तीन जणांच्या हातातून मोबाइल हिसकाऊन पळ काढला. रविवारी रात्री 7.30 वाजता या घटना घडल्या. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर सोमवारी रात्री पोलिसांनी दोन चोरट्यांना पकडले. हे दोन्ही चोरटे उच्चशिक्षीत आहेत. आकाश संजय पाटील (18, रा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे) व गणेश राजेंद्र शिंदे (18, रा. वाघनगर) असे चोरट्यांची नावे आहेत.

सीसीटीव्हीवरून आरोपी जाळ्यात
पहिल्या घटनेत सिंधी कॉलनीतील बाबा नगरातील रहिवासीगायत्री आडवाणी या आकाशवाणीजवळच्या संवेदना हॉस्पिटलजवळून जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी त्याच्या हातातील मोबाईल धुमस्टाईल लांबविला. दुसर्‍या घटनेत गणेश कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळच्या फिरोज शहा यांच्या ए टू झेड मोबाईल शॉप या दुकानात मोबाईल कव्हर घेण्याच्या बहाण्याने आलेल्या या 2 अज्ञात तरुणांनी हितेश प्रशांत बर्हाटे (18, रा. मुक्ताईनगर, बजरंग बोगद्याजवळ, जळगाव) या ग्राहकाचा मोबाइल हिसकावून धूम ठोकली. तसेच तिसर्‍या घटनेत रिंगरोड भागात एका अल्पवयीन मुलाच्या हातातूनही दुचाकीवरुन आलेल्या 2 अज्ञात तरुणांनी मोबाईल हिसकावून पळ काढला. तिन्ही घटनांमधील दोघेही संशयित हे वेगवेगळे नसून एकच असल्याचे सीसीटीव्हीच्या आधारे निष्पन्न झाले. दोघांना सोमवारी रात्री जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली. मंगळवार, 23 नोव्हेंबर रोजी दुपारी दोघांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !