हिरापूर गावातील अल्पवयीन मुलास फुस लावून पळविले


चाळीसगाव : तालुक्यातील हिरापूर येथून अल्पवयीन मुलास आमिष दाखवून अज्ञाताने फुस लावून पळवून नेले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलास आमिष दाखवून अज्ञात इसमाने पळवून नेल्याची धक्कादायक घटना सोमवार, 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास उघडकीला आली. दरम्यान, अल्पवयीन मुलगा हा मामाकडे आला असताना ही घटना घडली. घरच्यांनी परीसरासह नातेवाईकांकडे आजपर्यंत शोधाशोध केली मात्र अल्पवयीन मुलगा मिळून आला नाही. त्यावर वडीलांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादंवि कलम 363 प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मुलास आमिष दाखवून पळविल्याचे वडिलांनी फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पगारे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !