चाळीसगाव-धुळे मेमूतून प्रवास करताय मग ही वैशिष्ट्ये जाणून घ्यायलाच हवी !
चाळीसगाव : कोरोना काळानंतर सोमवार, 13 डिसेंबरपासून चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावर आठ डब्यांची प्रशस्त मेमू ट्रेन धावणार आहे. प्रवाशांचा प्रवास आता सुखद आणि सुलभ होणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे या ट्रेनला ऑनलाईन हिरवी झेंडी दाखवल्यानंतर ट्रेनचा शुभारंभ होणार आहे.
चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेनची ठळक वैशिष्ट्ये
मेमू ट्रेनमध्ये प्रवासात सुलभता वाढवण्यासाठी बेंच-प्रकारच्या कुशन सीट्स आहेत





प्रत्येक मेमू कोचला दुहेरी सरकणारे दरवाजे आणि एलइडी लाइटिंग प्रदान करण्यात आली आहे.
प्रत्येक मेमू कोचमध्ये इको-फ्रेंडली बायो टॉयलेट प्रदान केले आहेत.
प्रत्येक कोचमध्ये ऊर्जा कार्यक्षम एलईडी लाईट फिटिंग प्रदान करण्यात आली आहे.
आठ डब्यांच्या रेकमध्ये जास्त प्रवेग (एक्सलेरेशन) आणि डी-एक्सलेरेशन असते ज्यामुळे वेळेची बचत होते.
यात ऊर्जा-कार्यक्षम इलेक्ट्रिक ट्रॅक्शन प्रोपल्शन प्रणाली आहे.
या स्थानकावर मेमूला थांबे
भोरस बुद्रुक, जामदा, राजमाने, मोरदड तांडा, शिरूड, बोरविहिर, मोहाडी.
