साक्री नगरपंचायत निवडणुकीनंतर झालेल्या वादात युवतीचा खून
दोषींवर कारवाईसाठी महिलेचा मृतदेह साक्री पोलिस ठाण्यात ; सात दिवसांत कारवाईचे आश्वासन
साक्री : साक्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत ताराबाई राजेंद्र जगताप यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचा भाऊ रवींद्र याला काही जण मारहाण करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांची चुलत बहिण माया पवार व चुलत बहिण मोहिनी जाधव व अन्य जण धावून गेले होते मात्र मोहिनी जाधव यांचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला होता. यानंतर साक्री शहरात वातावरण तापले होते. या प्रकरणी संशयीतांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोषींवर कारवाईसाठी मृतदेह आणला पोलिस ठाण्यात
मयत मोहिनी जाधव यांच्या मृतदेहावर धुळे येथे शवविच्छेदन झाल्यानतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह साक्री पोलिस ठाण्यात आणून संताप व्यक्त केला. दोषींवर आठवडाभरात कारवाईचे आश्वासन यावेळी पोलिसांनी दिले.

अधिकार्यांची होती उपस्थिती
धुळ्याचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक प्रदीप मैराळे, सोनगीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनेश आहेर आदी उपस्थित होते. पोलिसांनी संशयितांना सात दिवसांत गजाआड केले जाईल. तसेच गुन्ह्याचा तपास सखोल होईल, असे आश्वासन दिल्यानंतर नातलगांचा रोष मावळला. त्यानंतर मोहिनी जाधव यांचा अंत्यविधी करण्यात आला. पोलिसांकडून संशयीतांचा शोध सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

