अज्ञात वाहनाच्या धडकेत गिरडगावच्या वृद्धाचा मृत्यू
यावल : तालुक्यातील गिरडगाव येथील रहिवासी जगन्नाथ परबत पाटील (73) हे रविवार, 16 जानेवारी रोजी चाळीसगाव येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र गुरुवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जगन्नाथ पाटील हे दिनांक 16 रोजी चाळीसगाव येथे गेले असता बेलगंगा कारखान्याजवळ त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर आधी चाळीसगाव व नंतर जळगाव येथे उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.


