सुनसगावजवळील फॅक्टरीत वेल्डींग करताना स्फोट : दोन कामगार जागीच ठार


भुसावळ : ऑईलने भरलेल्या टाकीला कामगारांकडून वेल्डींग केले जात असताना स्फोट होवून जागीच दोघे मजूर ठार झाले. ही घटना भुसावळपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलव्हाय शिवारातील दिव्या कॉपर मास्टर अलाईस अ‍ॅण्ड कंपनीत ऑईल कंपनीत शुक्रवार, 21 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. काशीनाथ फत्तू सुरवाडे (40, रा. खेडी रोड, जळगाव, मुळ रा.हतनूर) आणि खेमसिंग हेमराज पटेल (26, रा.बेमतेरा, छत्तीसगड) अशी मयतांची नावे आहेत.

ऑईलने भरलेल्या टाकीचा स्फोट
चोपडा तालुक्यातील आडगाव येथील कमलाकर माळी यांच्या मालकिची भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय शिवारात दिव्या कॉपर मास्टर अलाईस अ‍ॅण्ड कंपनी आहे. कंपनीत रॉ कॉपर वितळवून कॉपर प्लेट तयार केल्या जाताता व अन्य कंपनींना त्याचा पुरवठा केला जातो. कंपनीत एकूण चार कामगार असून शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास कंपनीतील काशीनाथ सुरवाडे व खेमसिंग पटेल हे लीक झालेल्या मात्र ऑईलने भरलेल्या टॉकीला वेल्डींग मशीनने वेल्डींग करताना अचानक स्पार्किंग होवून स्फोट झाला व दोघेही कामगार जागीच ठार झाले. या स्फोटानंतर कंपनीला आगदेखील लागल्याने अन्य कामगारांची पळापळ झाली.

अधिकार्‍यांसह प्रशासनाची धाव
बेलव्हाय शिवारात झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. तहसीलदार दीपक धीवरे, आमदार संजय सावकारे यांनी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले आहेत.

गुन्हेगारी नियंत्रणांसह सर्वसामान्यांना न्याय देणार : भुसावळातील नूतन पोलिस निरीक्षकांची भावना

दरम्यान, भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना घटनेची माहिती मिळताच तातडीने त्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !