अल्पवयीन मुलीला पळवले : यावल तालुक्यातील घटना


यावल : यावल तालुक्यातील तळेगाव न्हावी येथून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा
यावल तालुक्यातील तळेगाव न्हावी येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला असून बुधवार, 19 जानेवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास मुलगी ही मैत्रिणीकडे जात असताना अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेले. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा परिसरातील नातेवाईक व मैत्रिणींकडे शोधाशोध केली, परंतु कुठेही आढळून आली नाही. दरम्यान गुरुवारी, 20 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी फैजपूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीवर फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल देविदास सुरदास करीत आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !