सासर्याने केला सुनेचा विनयभंग : यावल तालुक्यातील घटना
फैजपूर : सासर्याने सुनेचा विनयभंग केल्याची घटना यावल तालुक्यातील एका गावात गुरुवार, 20 रोजी तसेच 21 रोजी घडली. या प्रकरणी शुक्रवार, 21 रोजी सुनेने तक्रार दिल्यावरून सासरे व सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सुनेसोबत गैरवर्तन करून तिला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचा सासर्यावर आरोप असून सासूने माझ्या नवर्याविरुद्ध खोटे आरोप लावत असल्याचे म्हणत सुनेला मारहाण केल्याचा सासुविरोधात आरोप आहे. फैजपूर पोलिसात विनयभंगाचा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल सुधाकर पाटील करीत आहेत.


