भुसावळात शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
भुसावळ : हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक शिवसेना पदाधिकारी व कट्टर शिवसैनिक उमाकांत (नमा) शर्मा यांच्यातर्फे विविध कार्यक्रम शहरात राबवण्यात आले. रविवारी सकाळी बाजारपेठ पोलिस स्टेशन समोर साहेबांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच उपस्थितांना बुंदीच्या लाडूचे वाटप करण्यात आले. यावेळी 125 लोकांना शिवभोजन वाटप करण्यात आले. यावेळी साहेबांच्या जीवनावरील निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी व चांदीचा शिक्का देवून गौरवण्यात आले. स्थानिक नगरपालिका दवाखान्यात औषधी साठ्याचे वाटप करण्यात आले.
गरजूंना मदत व गोरगरीबांना न्याय हाच साहेबांचा मूलमंत्र : नमा शर्मा
मांडवादिगर येथील एका शिवसैनिकावर शस्त्रक्रियेसाठी मदतनिधी आमदार संजय सावकारे व शिवसैनिकांच्या सहकार्यातून देण्यात आला. रविवारी जन्माला आलेल्या बाळासह त्याच्या मातेचा साडी-चोळी व रोख रक्कम देवून सत्कार करण्यात आला. साहेब कुठेच गेलेले नाहीत, ते आमच्या शिवसैनिकांच्या हृदयात आहे आणि कायम राहणार आणि त्यांचे आचार-विचार आपण सर्वांनी आत्मसात करून गोर-गरीब व गरजूंची मदत करावी तसेच पीडीतांना न्याय मिळवून द्यावा हाच साहेबांचा मूलमंत्र असल्याचे उमाकांत शर्मा म्हणाले.


यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार संजय सावकारे, सेनेचे माजी जिल्हाप्रमुख अॅड.जगदीश कापडे, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, प्रा.उत्तमराव सुरवाडे, जिल्हा परीषदेचे माजी गटनेता विश्वनाथ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष सचिन चौधरी, नगरसेवक राजेंद्र नाटकर, शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ, महिला जिल्हा प्रमुख पुनम बर्हाटे, शिवसेना शहरप्रमुख निलेश महाजन, बबलू बर्हाटे, सुरज पाटील, हेमंत बर्हाटे, शरद जोहरे, दिवाकर विसपुते, शरद जैसवाल, हेमंत खंबायत, गोकुळ बाविस्कर, बाळु भोई, राकेश खरारे, अरुण साळुंखे, जवाहर गौर, अॅड.कैलाश लोखंडे, दिलीप जोनवाल आदी शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
