राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण
मुंबई : कोरोनाच्या तिसर्या लाटेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये नियमावलींचे पालन करीत घरातच राहणे पसंत केले होते. त्यानंतर, राज्यात मिशन बिगेन अगेन सुरू झाल्यानंतर त्यांनी हळूहळू राज्यात सक्रीयपणे सहभाग घेत आपले दौरे केले. सुदैवाने कोरोनापासून ते दूर होते, मात्र कोरोनाच्या तिसर्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
ट्विट करीत दिली माहिती
ओमायक्रॉनचा धोका असल्याने तिसर्या लाटेत खरबदारी म्हणून कोरोना नियमावली व निर्बंध आणखी कडक करण्यात आले. तिसर्या लाटेत अनेकांना कोरोनाची लागण झाली, पण बेडची गरज किंवा रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली नाही त्यामुळे विलगीकरणात राहूनचा कोरोनावर अनेक नेत्यांनी मात केली आहे. आता, शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली.


संपर्कात आलेल्यांना आवाहन
माझी कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आली आहे. मात्र, काळजी करण्याचं कारण नाही. माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ची टेस्ट करावी आणि आपली काळजी घ्यावी, असे आवाहनही शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही.
गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 24, 2022
