रावेरात शासकीय धान्य खरेदीचा केंद्राचा शुभारंभ


रावेर : रावेर तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमतीत शासकीय भरड धान्य खरेदी योजनेंतर्गत धान्य खरेदीचे केंद्राचा शुभारंभ आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्याहस्ते नुकताच झाला. रावेर येथील महेंद्र पाटील यांच्या धान्य गोदाम परीसरात रविवारी केंद्र शासनाच्या शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचा प्रारंभ आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्याहस्ते काटा पूजन करून करण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
ज्वारीला दोन हजार 738 रुपये भाव असून 316 शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे तर मक्याला एक हजार 870 रुपये भाव असून 233 शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. याप्रसंगी शेतकरी बांधवांचा आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खरेदी-विक्री संघाचे चेअरमन पी.आर.पाटील, व्हा.चेअरमन किशोर पाटील, पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजे, मॅनेजर विनोद चौधरी आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !