जळगावात वंचित बहुजन आघाडीचे आमरण उपोषण मागे

यावलसह भुसावळातील कामांच्या चौकशीचे प्रशासनाचे आश्वासन


भुसावळ/जळगाव : यावल नगरपरीषदेच्या उद्यान कामात झालेला भ्रष्टाचार व भुसावळ शहरातील सायर मेडिकल ते जामनेर रोडकडे जाणार्‍या रस्त्यावरील पूलाच्या बांधकामाची चौकशी करण्याच्या आश्वासनानंतर जळगावात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडण्यात आलेले उपोषण मागे घेण्यात आले.

गैरव्यवहार झाल्याचा वंचित आघाडीचा आरोप
यावल येथे नगरपालिकेकडून उद्यानाच्या कामासाठी निविदा प्रकाशित करण्यात आली होती. या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी करून चौकशी करण्याची मागणी केली .तसेच भुसावळ शहरातील सायर मेडिकल ते जामनेर रोड कडे जाणार्‍या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या कामातही मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. या दोन्ही कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी विनोद सोनवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविवार, 23 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाची तातडीने दखल घेत यावल नगर परीषदेच्या उद्यान कामातील भ्रष्टाचार झाल्याबाबत सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी पत्र जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखेचे प्र.सहायक आयुक्त प्रशांत सरोदे यांनी दिले आहे. तसेच भुसावळ शहरातील सायर मेडिकल ते जामनेर रोड कडे जाणार्‍या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामातील गैरप्रकाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकार्‍यांना दिल्याने विनोद सोनवणे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले.



उपोषणाला अनेकांचा पाठिंबा
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला या ठिकाणी पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हा महासचिव वैभव शिरतुरे, जिल्हा संघटक राजेंद्र बारी, देवदत्त मकासरे, महानगराध्यक्ष दीपक राठोड, डिगंबर सोनवणे, गमीर शेख, भरत ससाणे, शांताराम अहिरे, बोदवड तालुकाध्यक्ष सुपडा निकम, जिल्हा आय.टी.सेल जिल्हाप्रमुख सचिन बार्‍हे, जितेंद्र केदार, विजय सावकारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदना आराक, प्रमिला बोदडे, कामगार आघाडी जिल्हा चिटणीस बालाजी पठाडे, कुणाल सुरडकर, भुसावळ तालुकाध्यक्ष संतोष कोळी, राजेंद्र गवळी, जितेंद्र सुर्यवंशी, चंद्रभान सोनवणे व जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !