माजी मंत्री महाजनांचा माजी मंत्री खडसेंना टोला : रडीचा डाव खेळू नका, राष्ट्रवादी जिवंत ठेवा
जामनेर : बोदवड नगरपंचायतीच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री एकनाथराव खडसे (eknathrav khadse) यांनी बोदवडमध्ये शिवसेना आणि भाजपची छुपी युती असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाला माजी मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) यांनी जामनेरात गुरुवारी दुपारी महावितरण कंपनीच्या विरोधात काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चानंतर उत्तर दिले आहे. खडसेंनी राष्ट्रवादी जिवंत ठेवावी, रडीचा डाव खेळू नये, असे ते म्हणाले आहेत. महाजन म्हणाले की, याची युती, त्याची युती होती, असे करण्यापेक्षा आपल्या मनगटात जोर पाहिजे’ अशा शब्दांत भाजप नेते गिरीश महाजन (bjp leader girish mahajan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (ncp leader eknathrav khadse) यांना जोरदार टोला लगावला आहे.
भेट घेतली म्हणजे युती होत नाही
बोदवडच्या निवडणुकीत आम्ही कोणाशीही युती केलेली नव्हती. फक्त प्रचारादरम्यान शिवसेनेच्या आमदारांशी माझी भेट झाली, आम्ही चहा घेतला म्हणजे युती होती, असे होत नाही. याची युती होती, त्याची युती होती, असं करण्यापेक्षा आपल्या मनगटात जोर पाहिजे, असा टोला गिरीश महाजन (bjp leader girish mahajan) यांनी खडसेंना (eknathrav khadse) लगावला.


भाजपाची काळजी तुम्ही करू नका
खडसेंवर निशाणा साधताना गिरीश महाजन (bjp leader girish mahajan) पुढे म्हणाले की, तुम्ही विधानसभा हरलात. कोथळीत चार ग्रामपंचायत सदस्यही तुमचे नाहीत. मुक्ताईनगरमध्ये तुमचा नगराध्यक्ष नाही आहे आता तर बोदवड पण तुमच्या हातून गेले. तुम्ही भाजपची काळजी करू नका. तुमचेच बघा ना, रडीचा डाव खेळू नका. तुम्ही तुमची राष्ट्रवादी जिवंत ठेवा, भाजपची काळजी करू नका, असा चिमटाही गिरीश महाजन (bjp leader girish mahajan) यांनी काढला आहे.
