मधुकर कारखान्याची चिमणी लवकरच पेटणार !
कारखाना चेअरमन व विनोद सोनवणे यांच्यात झाली सकारात्मक चर्चा
भुसावळ : गेल्या अनेक महिन्यांपासून मधुकर सहकारी कारखाना बंद असून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी या संदर्भात कारखाना चेअरमन याच्ंयाशी चर्चा केल्याने मधुकर सहकारी कारखाण्याची चिमणी पेटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मधुकर साखर कारखाना अनेक दिवसांपासून बंद करण्यात आला आहे त्यामुळे उत्पादक शेतकरी, कारखाना कामगार अडचणीत आले आहेत. कर्मचार्यांचे तर अनेक महिन्याचे वेतन, भत्ते व इतर लाभ प्रलंबित आहेत. यातून मार्ग काढण्याची विनंती कारखाना कामगारांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांना केली होती. यात स्वतः विनोद सोनवणे यांनी कारखाना संचालक मंडळ आणि चेअरमन याच्याकडे सतत पाठपुरावा केला आहे.
भाडेतत्वाबाबत पुन्हा निघणार निविदा
ऊस उत्पादक शेतकरी कारखाना कामगार व कर्मचारी या सर्वच्या समस्या सुटून रोजगार सुरू व्हावा म्हणून कारखाना भाडेतत्त्वावर देण्यात यावा यावर सर्वाचे एकमत झाले होते मात्र निविदा प्रक्रिया सुरू केली परंतु काही अटीं मुळे पाहिजे त्याप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही म्हणून पुन्हा वंचितने चेअरमन याच्याशी चर्चा केली त्यातून लवकरच कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबत निविदा काढण्यात येणार असल्याचे ठरले.


शेतकरी, कामगार सुखावले
पुन्हा एकदा ‘मधूकरची’ चिमणी पेटणार असल्याने ऊस उत्पादक शेतकरी कारखाना कामगार व कर्मचारी वर्ग सुखावला आहे. याप्रसंगी मसाकाचे चेअरमन यांच्याशी चर्चा करतांना वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, कामगार मोहन पाटील, कामगार हमीद शाह, कामगार वसंत चौधरी, कामगार अरुण पाटील, कामगार सुनील अडकमोल, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राजेंद्र बारी, जिल्हा संघटक अरुण तायडे, यावल तालुका सचिव विजय सावकारे, देवदत्त मकासरे, मिलिंद जंजाळे उपस्थित होते.
