खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रकची दुचाकीला धडक : चिंचगव्हाणचे दोघे तरुण ठार
मेहुणबारे : खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजता चाळीसगाव-धुळे रस्त्यावरील चिंचगव्हाण फाटा ते खडकीसीम दरम्यान दत्त मंदिरासमोर घडली. चाळीसगावकडून घरी जाणार्या चिंचगव्हाण, ता.चाळीसगाव येथील तरुणांच्या दुचाकीला मार्बल घेऊन जाणार्या ट्रकने खड्डे चुकविण्याच्या नादात जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, धडकेत दोन्ही तरुण जागीच ठार झाले. ट्रक रस्त्याच्या कडेला उलटली असून, ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
चिंचगव्हाणचे दोघे तरुण अपघातात ठार
मेहुणबारे, ता.चाळीसगाव येथून चिंचगव्हाण येथे घरी दुचाकी (क्रमांक एमएच-19-एझेड-3409) हिच्यावरुन दीपक रघुनाथ निकम (वय 21) व अमोल राजेंद्र वाघ (वय 21) हे घरी जात होते. घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला धुळ्याकडून चाळीसगावकडे मार्बल घेऊन जाणाजया ट्रक (क्रमांक एमएच-18-एए-8147) भरधाव वेगात जात होती. चिंचगव्हाण फाटा ते खडकीसीम दरम्यान असलेल्या रस्त्यावर दत्त मंदिरासमोर ट्रकने दुचाकीला समोरून धडक देत उडविले. या धडकेने दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मेहुणबारे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.



