भाजपा नेते किरीट सोमय्यांना पुण्यात शिवसैनिकांकडून धक्काबुक्की


पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या (bjp leader kirit somaiya) यांना पुण्यात शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याने पुण्यात खळबळ उडाली. किरीट सोमय्या जखमी झाले असून उपचारार्थ पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल झाले आहेत.

झटापटीत सोमय्या पडले
पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या (bjp leader kirit somaiya)  शनिवारी पुणे दौर्‍यावर आले होते. पुणे महापालिका परीसरात असताना सोमय्या यांना काही शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या महापालिकेच्या इमारतीच्या पायर्‍यांवर कोसळले. यात त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.



अन शिवसैनिकांशी झाली झटापट
कोरोना काळात पुण्यात जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे परंतु या कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या (bjp leader kirit somaiya)  यांनी केला. या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी ते आज पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पुणे महानगरपालिकेत आयुक्तांनाही यावेळी सिरीट सोमय्या (bjp leader kirit somaiya) तक्रार देणार होते. परंतु, यावेळी सोमय्या पुणे महापालिकेच्या इमारतीत प्रवेश करताना इमारतीत आधीपासूनच उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि झटापट झाली. त्यानंतर सोमय्या यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत सोमय्या पालिकेच्या पायर्‍यांवर पडले. त्यामध्ये ते जखमी झाले. उदरम्यान, किरीट सोमय्या यांच्या विरोधात पुण्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी सोमय्या यांची गाडी अडवून गाडीवर हाताने ठोसे मारले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पुणे महानगरपालिकेच्या (pune mahanagarpalika) इमारतीसमोर एकच गोंधळ उडाला.

आता ब्लड प्रेशर नॉर्मल
आता किरीट सोमय्या (bjp leader kirit somaiya)  यांच्या प्रकृतीबाबत संचेती रूग्णालयाच्या डॉ. पराग संचेती यांनी माहिती दिली आहे. किरीट सोमय्यांच्या मनगटाला मार लागला आहे. घाबरल्यामुळे त्यांचा ब्लड प्रेशर वाढला होता. परंतु, आता त्यांचा ब्लड प्रेशर नॉर्मल झाला आहे. त्यांना फ्रॅक्चर झालेले नाही. मुक्का मार लागला आहे. त्यामुळे उद्या सकाळपर्यंत त्यांना संचेती रुग्णालयात (sancheti hospital) निगराणीखाली ठेवण्यात येईल आणि त्यानंतर डिस्चार्ज देण्यात येईल, असे डॉ. पराग संचेती यांनी सांगितले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !