वरणगावात कीर्तनकार बंडातात्या कराडकरांचा राष्ट्रवादीतर्फे निषेध


वरणगाव : कीर्तनकार बंडा तात्या कराडकर यांनी महिलांविषयी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया मुळे, भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचे पडसाद वरणगावातही उमटले. वरणगाव येथे शनिवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने कीर्तनकार बंडा तात्या यांचा निषेध करून पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक नीलेश सोळुंके यांना निवेदन देण्यात आले.

“त्या’ वक्तव्याने राष्ट्रवादी आक्रमक
राज्य सरकारच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावर टीका करताना कीर्तनकार बंडा तात्या कराडकर यांनी काही महिला लोकप्रतिनिधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. कराडकर यांच्याविरुद्ध ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. वरणगाव येथेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभा तावडे, शहराध्यक्षा रंजना पाटील, माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, श्रद्धा गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष समाधान चौधरी, पप्पू जकातदार, माजी नगरसेवक रवींद्र सोनवणे, कैलास माळी, शांताराम सुरळकर, राजेश चौधरी, सुधाकर जावळे, नरेंद्र इंगळे, साजिद कुरेशी, अनिल चौधरी, सोहील कुरेशी, महेश सोनवणे, शेख आसिफ हुसेन यांनी निवेदन दिले.



कीर्तनकाराच्या तोंडी अशोभनीय भाषा
महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला मोठी परंपरा आहे. त्यात एकमेकांप्रती, महिला भगिनींविषयी आदरभावाची शिकवण दिली जाते मात्र या परंपरेचे पाईक म्हणवून घेणारे बंडातात्या कराडकर यांच्यासारखे लोक महाराष्ट्राच्या संस्कृतीला निव्वळ राजकारण करण्यासाठी गालबोट लावत आहे. सवंग प्रसिद्धीसाठी त्यांनी महिला लोकप्रतिनिधींबद्दल केलेले वक्तव्य स्वीकाहार्य नाही. यापूर्वी देखील त्यांनी विनाकारण राजकीय व्यक्तव्ये करून वाद ओढवून घेतले आहेत. शासनाने त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी निवेदन देताना केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !