रावेर विधानसभेसाठी तीन वाजेपर्यंत 47.80 टक्के मतदान
आजी-माजी आमदारांसह अपक्ष उमेदवारांनीही बजावला मतदानाचा हक्क
रावेर : रावेर-यावल विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी सकाळपासून मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला. दुपारी तीन वाजे पर्यंत 47.80 टक्के मतदान झाले. यावलसह रावेर तालुक्यात मोठ्या संख्येने स्त्री व पुरूष मतदार बाहेर पडले. सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या दोन तासात 6.78 टक्के मतदान झाले तर सकाळी 11 वाजेपर्यंत 18.19 टक्के मतदान झाले तसेच दुपारी एक वाजेपर्यंत 32.27 टक्के मतदान झाले व तीन वाजे पर्यंत 47.34 टक्के मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगिते.
बारी वाड्यातील महिलांनी एकत्र येत केले मतदान
रावेर विधासभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रावेर शहरातील बारी वाड्यातील सुमारे चाळीस ते पन्नास महिलांनी एकत्र येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. रावेर शहरातून महिलांची एकत्रीतपणे महिला हक्क बजावण्यासाठी रांगा ल ावत निघाल्याने महिलावर्गाचे कौतुक करण्यात आले. इतर महिलांनीदेखील या महिलांचा आदर्श घेत मतदानासाठी बाहेर पाऊल टाकले.

सखी मतदान केंद्रावर महिलांचा उत्साह
रावेर शहरातील यशवंत विद्या शाळेतील सखी मतदान केंद्रावर कल्पना नगरे यांनी प्रथम मतदान करण्याचा बहुमान मिळविला. त्यांचे स्वागत नायब तहसीलदार कविता देशमुख आणि केंद्राध्यक्ष क्रांती नाईक यांनी गुलाबपुष्प देऊन केले. रावेर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार अभिलाषा देवगुणे, नायब तहसीलदार कविता देशमुख, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, मतदान अधिकारी शे.गजाला तबस्सुम, आफरीन तडवी, लीना महाजन, मंगला आदींची उपस्थिती होती. विशेष म्हणजे या केंद्रावरील कर्मचार्यांसाठी ड्रेस कोडदेखील निश्चित करण्यात येवून महिलांसाठी सर्वोतोपरी सुविधा पुरवण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
आमदार हरीभाऊ जावळेंनी भालोदमध्ये बजावला हक्क
रावेर विधानसभेचे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार हरीभाऊ जावळे यांनी भालोद येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. फैजपूरच्या म्युन्सीपल हायस्कूलमध्ये व्हील चेअरची व्यवस्था नसल्याने त्यांनी तत्काळ अधिकार्यांशी संपर्क साधला. जिल्हा दूध संघ संचालक हेमराज चौधरी, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य भरत महाजन, माजी संचालक नितीन राणे यांच्यासह शिवसेनेचे आप्पा चौधरी, राजू काठोके, भाजप शहराध्यक्ष संजय रल यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी आमदारांनी खिरोद्यात तर अपक्ष उमेदवार चौधरींनी रावेरात बजावला हक्क
माजी आमदार शिरीष चौधरी यांनी खिरोदा गावातील जि.प.शाळेत पत्नी डॉ.अरुणा चौधरी यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला तर अपक्ष उमेदवार व भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी रावेर शहरातील यशवंत विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला.



