छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे
भुसावळातील पालकमंत्र्यांना वंचित बहुजन आघाडीने दिले निवेदन
भुसावळ : भुसावळ नगरपरीषद हद्दीत विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी शनिवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील शहरात आल्यानंतर बाजारपेठ पोलिस स्टेशनजवळ वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे व सहकार्यांनी पालकमंत्र्यांचा ताफा थांबवत भुसावळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे घातले. या मागणीसंदर्भात दखल घेवून बैठक लावण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.


पुतळ्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित
बाजारपेठ पोलिस स्टेशनजवळील नियोजित जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची असून अनेक वर्षानंतरही शिवरायांचा पुतळा बसविणे सत्ताधार्यांना शक्य झालेले नाही. शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बसवून भुसावळकरांची इच्छा पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या समवेत वंचितचे जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, कामगार आघाडीचे बालाजी पठाडे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव, जिल्हा महासचिव महिला आघाडी वंदना आराक, जिल्हा संघटक महिला आघाडी शोभा सोनवणे, बंटी सोनवणे, तालुका सचिव गणेश इंगळे, मेजर देवदत्त मकासरे, रुपेश कुर्हाडे, विजय मालवीय, कुणाल सुरडकर, सुनील ठाकूर आदींसह अनेक महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
