मुक्ताईनगर पंचायत समितीच्या सभापतीपदी सुनीता चौधरी


मुक्ताईनगर : पंचायत समितीच्या सभापतीपदी अंतुर्ली गणातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता किशोर चौधरी यांची तर उपसभापतीपदी सुवर्णा प्रदीप साळुंके यांची वर्णी लागली. मंगळवार, 15 फेब्रुवारी रोजी पंचायत समितीमध्ये निवड प्रक्रिया झाली. सभापती व उपसभापतीपदी प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आला. पीठासीन अधिकारी तहसीलदार श्वेता संचेती होत्या.

रीक्त पदासाठी निवडणूक
पंचायत समितीच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा रोवला गेला होता मात्र माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर एकमेव राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेल्या सदस्या सुनीता चौधरी यांची निवड सभापतीपदी झाली. सुवर्णा साळुंके यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्याने सुनीता चौधरी यांची 27 सप्टेंबर रोजी प्रभारी सभापती म्हणून निवड झाली होती. नंतर 7 ऑक्टोंबर रोजी विकास पाटील यांची सभापतीपदी वर्णी लागली होती. 2 फेब्रुवारी रोजी जिल्हा परीषदेचे समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे यांची जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी मुक्ताईनगर पंचायत समिती सभापती पदी पुढील निवड होईपावेतो सभापतीपदी निवड केली होती. भाजपाचे जि.प.चे समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे यांची मुक्ताईनगर पंचायत समिती सभापतीपदी वर्णी लागल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या होत्या.



निवडीप्रसंगी यांची उपस्थिती
निवडीप्रसंगी नवनिर्वाचि सभापती सुनीता चौधरी, उपसभापती सुवर्णा साळुंके, सदस्य विकास पाटील, सदस्या शुभांगी भोलाणे, गटविकास अधिकारी संतोष नागतिळक, कार्यालयीन अधीक्षक सुधाकर राठोड, लिपिक शिराळे उपस्थित होते.
राष्ट्रवादी नेते एकनाथराव खडसे यांनी सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन केले आहे. जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे खेवलकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील व पदाधिकार्‍यांनी नवनिर्वाचीत सभापती, उपसभापती यांचा सत्कार केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !