शहिद भगतसिंग फौंडेशनतर्फे खुल्या निबंध स्पर्धा


भुसावळ : वाचन -लेखन चळवळीला गती येण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहिद भगतसिंग फौंडेशनतर्फे खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व वयोगटातील स्पर्धक या निबंध स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

या विषयांवर निबंध स्पर्धा
निबंध स्पर्धेसाठी राष्ट्रपिता महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व वर्तमानात त्यांच्या शैक्षणिक विचारांची आवश्यकता तसेच भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात जळगाव जिल्ह्यातील क्रांतीकारकांचा कृतीशील सहभाग एक प्रेरणेचा दीपस्तंभ या विषयावर निबंध स्पर्धा होत आहे. निबंध मराठी भाषेतच असावा तसेच शब्द मर्यादेचे बंधन नाही व निबंध हस्तलिखीत किंवा टंकलिखीत असावा, असे आयोजकांनी कळवले आहे. प्रथम विजेत्यासह सात हजार रुपये व सन्मान पत्र तसेच द्वितीय विजेत्यास पाच हजार व सन्मानपत्र तसेच तृतीय क्रमांक तीन हजार व सन्मानपत्र व उतेजनार्थ प्रथम एक हजार रुपये व सन्मान पत्र तसेच उतेजनार्थ द्वितीय क्रमांक पाचशे रुपये व सन्मानपत्र बक्षीस दिले जाणार आहे. स्पर्धेसाठी शंभर रुपये प्रवेश फी असून गुगल वा फोन पे स्पर्धकास ती 9967874171 (निलेश रायपुरे) या क्रमांकावर स्पर्धकास ती पाठवता येणार आहे. स्पर्धकांनी आपले निबंध सोमवार, 28 फेब्रुवारीपूर्वी निलेश रायपुरे, ए-1, पंढरीनाथ नगर, संतधाम मागे, जामनेर रोड, भुसावळ पत्यावर पाठवावे, असे आवाहन शहिद भगतसिंग फौंडेशनचे अध्यक्ष निलेश रायपुरे यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !