जळगाव जिल्ह्यात खेलो इंडिया सेंटरची निर्मिती : राज्य निदेशक प्रकाश मनुरे

भुसावळातील बियाणी सैनिकी शाळेस सदिच्छा भेट : मैदानाची पाहणी


भुसावळ : केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाचे नेहरू युवा केंद्र संघटनेचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे राज्य निर्देशक प्रकाश मनुरे यांनी नुकतीच शहरातील बियाणी सैनिकी शाळेस सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थाध्यक्ष मनोज बियाणी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रसंगी अध्यक्ष मनोज बियाणी (manoj biyani) व सचिव डॉ.संगीता बियाणी (dr.sangita biyani) यांनी बियाणी एज्युकेशन ग्रुप अंतर्गत सुरू असलेल्या विविध शैक्षणिक संस्थांची माहिती दिली. बियाणी एज्युकेशन ग्रुप द्वारा केल्या जाणार्‍या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे प्रकाश  मनुरे यांनी कौतुक केले व संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी आमदार संजय सावकारे, संस्थेचे उपाध्यक्ष विनोद बियाणी, संचालिका स्मिता बियाणी, प्राचार्य डी.एम.पाटील, बियाणी स्कूलचे प्राचार्य रुद्रसेन गंठिया तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यात खेलो इंडिया सेंटरची निर्मिती
आमदार संजय सावकारे (mla sanjay sawkare) तसेच राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त रणजीतसिंग राजपूत यांच्या निवासस्थानी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाचे नेहरू युवा केंद्र संघटनेचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे राज्य निर्देशक प्रकाश मनुरे यांनी भेट दिली. तसेच आरपीडी रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाची पाहणी केली. दरम्यान, युवकांना सुदृढ राहण्यासाठी भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येणार्‍या फिट इंडिया उपक्रम व खेलो इंडिया ायासारख्या उपक्रमांवर देखील त्यांनी मार्गदर्शन केले. जळगाव जिल्ह्यातील युवकांना क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी खेलो इंडिया सेंटरची देखील निर्मिती केली जाईल, असे आश्वासन त्यांनी आमदार संजय सावकारे (mla sanjay sawkare)  यांच्याशी चर्चेदरम्यान दिले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !