भुसावळातील रेल्वे तिकीट बुकींग खिडकीजवळ अनोळखी प्रवाशाचा मृत्यू
भुसावळ : 50 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री 9.10 वाजता रेल्वे स्थानकावर घडली. रेल्वे स्थानकावरील दक्षिण भागातील रेल्वे तिकीट बुकींग कार्यालयाजवळील शेडमध्ये मृतदेह आढळला. याप्रकरणी उपस्टेशन मास्तर यांंनी दिलेल्या फिर्यादीवरून जीआरपी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रेल्वे स्थानकाच्या परीसरात मरण पावलेल्या प्रवाशांचे नाव, गाव यांचा शोध सुरू आहे. ओळख पटत असल्यास भुसावळ लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधण्याचे तपासाधिकारी सहायक फौजदार बबन शिंदे यांनी केले आहे.


