भुसावळात शहरातील डी.एस.हायस्कूल टाकणार ‘कात’

तत्कालीन शिक्षण सभापती मुकेश पाटील यांच्या पाठपुराव्याला आले यश : नोव्हेंबर 2020 मध्ये केले सुक्ष्म नियोजन


भुसावळ : विकासाची दूरदृष्टी व जनहिताच्या कामांची तळमळ असल्यास अशक्यप्राय काहीही नसते. त्याचा प्रत्यय भुसावळकरांना माजी शिक्षण सभापती व माजी नगरसेवक मुकेश पाटील यांच्या रूपाने आला आहे. शिक्षण सभापती पदावर असताना नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी भुसावळातील डी.एस.हायस्कूलचे स्वरूप (पुर्नजीवन) बदलण्यासाठी पुढाकार घेतला होता व प्रत्यक्षात त्यांचे स्वप्नदेखील आता साकार होत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत या शाळेतील विविधांगी कामांचा शुभारंभ करण्यात आला.

नोव्हेंबर 2020 मध्ये केले होते नियेाजन
शाळा आवारात सिंचनाची सुविधा करून शोभीवंत रोपे, फुलझाडे लावण्यात येतील. वृक्षारोपणासह ते संवर्धित करून ग्रीन स्कूलची निर्मिती होईल. डी.एस. हायस्कूलची इमारत जीर्ण झाल्याने तसेच दरवाजे व खिडक्या तुटल्याने या कामासाठी नोव्हेंबर 2020 मध्ये शिक्षण सभापती मुकेश पाटील यांनी या कामांचे नियोजन केले होते मात्र आता ही कामे लवकरच पूर्ण होणार आहेत.



आनंद शब्दात सांगणे अशक्य : मुकेश पाटील
विकासाची दूरदृष्टी ठेवून डी.एस.हायस्कूलचे पुर्नजीवन करण्याचा निर्धार करून प्रत्यक्षात त्यावेळी शिक्षण सभापती असताना मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना साकडे घातले होते. त्यांनी ठराव घेऊन प्रक्रिया पूर्ण केली. तब्बल 25 ते 30 वर्षांनंतर शाळा इमारतींच्या पुनरुज्जीवनाची मुहूर्तमेढ आपल्या कार्यकाळात रोवल्याचा आनंद शब्दातीत असल्याचे माजी शिक्षण सभापती मुकेश पाटील यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.

ई लर्निंग, डिजिटल लर्निंगसाठीही प्रयत्न
शिक्षणाच्या पद्धती झपाट्याने बदलत आहेत. यामुळे खाजगी शाळांच्या स्पर्धेत पालिका शाळांमध्येही दर्जेदार शिक्षणासाठी प्रयत्न होत आहेत. शाळांचे अंतरंग व बाह्यरंग सुस्थितीत नसल्याने शिक्षणाचा दर्जा घसरतो. त्यात आमूलाग्र बदल करून पालिका शाळांमध्येही ई व डिजिटल लर्निंग सुरू करण्याचे प्रयत्न होतील.

डी.एस.हायस्कूल टाकणार कात
सुमारे 30 वर्षांनंतर डी.एस. हायस्कूलचे प्रथमच पुनरुज्जीवन होणार आहे. तब्बल दीड कोटी रुपये निधी खर्चातून होणार्‍या या कामाचे नुकतेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. पालिका शाळांची रयाच बदलणार आहे. गेल्या काळात पालिका शाळांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न झाले मात्र त्यातून केवळ निधीचा अपव्यय झाला, सुविधा मात्र मिळाल्या नाहीत. शहरातील डी.एस.हायस्कूलच्या मागील भागातील जीर्ण इमारत आता अखेरची घटका मोजत आहे. नवीन इमारत बांधकामासाठी पालिका प्रशासनाकडे निधी नाही. त्यामुळे आता या इमारतीचे मजबुतीकरण व इतर सर्व पायाभूत सुविधा देण्यासाठी पालिकेचे प्रयत्न आहेत. तब्बल दीड कोटी रुपयांच्या निधीतून डी.एस. हायस्कूल, म्युनिसिपल व काही शाळांचे पुनरुज्जीवन होणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !