पालकमंत्र्यांच्या टिकेनंतर माजी मंत्री खडसे म्हणाले ; ‘चोरो को सारे नजर आते है चोर’


जळगाव : जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी एकमेकांवर चालवलेल्या टिकेच्या बाणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अहमदनगर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील  (Jalgaon Palakmantri Gulabrao Patil) यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknathrav Khadse) व माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर टीकास्त्र सोडत ‘आमच्या जिल्ह्यात एकनाथ खडसेंसारखा डाकू बसला आहे’ असे वक्तव्य केले होते. त्यावर एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी रात्री नशिराबाद येथे आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना गुलाबराव पाटील यांच्यावर पलटवार करीत गुलाबराव पाटील (Jalgaon Palakmantri Gulabrao Patil) यांच्यासारख्या निर्व्यसनी माणसाविरुद्ध न बोललेलं बरे ‘चोरो को सारे नजर आते है चोर’ अशा शब्दात प्रत्युत्तर दिल्यानंतर खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी पदाधिकारी म्हणाले : पालकमंत्र्यांनी खडसेंची माफी मागावी
या दोन्ही नेत्यांच्या वादात आता राष्ट्रवादी पक्षाकडून प्रतिक्रिया उमटली आहे. पालकमंत्री पाटील यांची एकनाथराव खडसेंविषयी (Eknathrav Khadse) बोलताना वारंवार जीभ घसरते. त्यांच्या बोलण्यातून नेहमीच आकस दिसून येतो. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडे लोटांगण घालतानाचे उदाहरण लपून राहिलेले नाही. पालकमंत्र्यांना आघाडी धर्माचा विसर पडतो की काय? भाजप नेत्याने जशी चावी फिरवली तसे गुलाबराव पाटील हे नाचतात अशी शंका उपस्थित केली. खडसेंबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा जळगाव महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी दिला आहे.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !