कोसगावच्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
यावल : तालुक्यातील कोसगाव येथील ३८ वर्षीय तरुणाने रविवार, २० फेब्रुवारी रोजी दुपारी राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गणेश संताजी पाटील (३८, रा.कोसगाव, ता.यावल, जि.जळगाव) असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.
आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट
गणेश पाटील हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. गेल्या काही दिवसांपासून तो कौटुंबिक वादामुळे तणावात होता. रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घरी कुणीही नसतांना गणेश पाटील याने साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. नातेवाईकांनी त्याला तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्याचा मयत घोषीत केले. फैजपूर पोलिसात समाधान पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.शुभम तिडके यांनी शवविच्छेदन केले. पुढील तपास हवालदार महेश वंजारी, गोकूळ तायडे करीत आहे.


