बेपत्ता 36 वर्षीय युवकाचा नदीपात्रात आढळला मृतदेह


शिरपूर : गुरे चारण्यासाठी जातो असे सांगून घराबाहेर गेलेल्या पिळोदा येथील 36 वर्षीय युवकाचा मृतदेह तालुक्यातील पिळोदा लगत असलेल्या नदीपात्रात तीन दिवसानंतर रविवार,20 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ईश्वर फुलसिंग भील (36, रा.पिळोदा, ता.शिरपूर) असे मृतदेह आढळून आलेल्या युवकाचे नाव आहे.

मृतदेह आढळल्याने खळबळ
ईश्वर भील हा युवक 17 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी बारा साडे बारा वाजेच्या सुमारास गुरे चारण्यासाठी जातो असे घरात सांगून निघून गेला परंतु सायंकाळी घरी परत आला नसल्याने त्याचा शोध घेतला जात असताना 3 दिवसानंतर रविवार 20 फेब्रुवारी 2022 रोजी पिळोदा लगत असलेल्या नदी पात्रात सकाळी 8 वाजेच्या सुमारास मयत स्थितीत मृतदेह आढळून आला .त्यास शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले असता डॉ.पावरा यांनी तपासणी करून मयत घोषित केले.याप्रकरणी मयताच्या चुलत भावाने थाळनेर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर चव्हाण करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !