वडाळीतील युवकाचा अपघातात मृत्यू
शिरपूर : शहादा रस्त्यावर वरुळ शिवारात 30 नोव्हेंबर रोजी दुपारी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील वडाळीचा युवक जखमी झाला होता.
धुळे येथील रुग्णालयात सुरू होते उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. गुलाबगीर शिवाजीगीर बावा (रा.वडाळी, ता.शहादा) असे मयत युवकाचे नाव आहे.

अज्ञात वाहनाने दिली होती धडक
शिरपूर-शहादा रस्त्यावर वरुळ शिवारात शिरपूरकडे येणार्या एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात शहादा तालुक्यातील वडाळी येथील गंभीर जखमी 38 वर्षीय युवकाचा धुळे येथे उपचारादरम्यान 20 फेब्रुवारी 2022 रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी शिरपुर शहर पोलीस ठाण्यात सोमवारी नोंद करण्यात आली.

