माजी मंत्री खडसे स्पष्टच म्हणाले : पालकमंत्र्यांना धडा शिकवण्याची वेळ आली
भुसावळ : तब्बल 30 वर्ष या जनतेने आपल्याला निवडून दिले असतानाच आपला उल्लेख डाकू म्हणून करण्यात आला मात्र खरे तर हा अपमान माझ्यासह त्या जनतेचा, तुमचा आहे, पत्रकारांचा त्यामुळे गुलाबराव पाटील यांना धडा शिकवून घरी बसवण्याची वेळ आली आहे, अशी जोरदार टिका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर सभेत केली.
गुलाबराव तुमच्या नावाची सुरवातच खराब
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर तोफ डागली सांगितले की, गुलाबराव तुमच्या नावाची सुरुवातच खराब आहे. जो शक्तीमान असतो त्याच्याविरोधात शक्ती एकवटल्या जातात व माझ्या विरोधात ते जिल्ह्यात होताना दिसून येत आहे. बोदवडमध्ये भाजपा-शिवसेनेने छुपी युती करून आपला पराभव करण्याचा प्रयत्न केला मात्र राष्ट्रवादीला एकट्याने हरवणे शक्य नाही हे यातून स्पष्ट दिसून येत आहे, असेही खडसे म्हणाले.


