रावेरात मंत्री नवाब मलिकांवरील कारवाईचा राष्ट्रवादी पदाधिकार्यांकडून निषेध
रावेर : धरणगाव येथे बालिकेवर अत्याचार करणार्या आरोपीविरुद्ध कठोरात-कठोर शासन करावे तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांची ईडीकडून होत असलेल्या चौकशीचा निषेध करीत रावेर तालुक्यातील राष्ट्रवादी महिला पदाधिकार्यांनी शुक्रवारी रावेर तहसीलदार प्रशासनाला निवेदन दिले.
यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष शकुंतला महाजन, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष रेखा चौधरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, शब्बीर शेख जिल्हा सरचिटणीस, माया बारी, लिना महाजन, बबिता तडवी, शुभांगी पाटील, सरला पाटील, कविता गोळसे, कुसूम तायडे, लिलाबाई मोरे, हसनूर तडवी, अर्चना पाटील, पांडुरंग पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.


