नायगावातील शिवसेना पदाधिकार्‍यांचा राष्ट्रवादीत प्रवेश


मुक्ताईनगर : तालुक्यातील नायगाव येथील उपसरपंच तथा शिवसेना शाखा प्रमुख महेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य किशोर महाजन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवत शिवसेनेला रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यांनी केला प्रवेश
प्रवेश करणार्‍यांमध्ये पवन पाटील, संदीप पाटील, विनोद महाजन, किरण पाटील, चंदन पाटील, मुकेश पाटील, मधुकर पाटील, किशोर पाटील, प्रदीप पाटील, अभिनय पाटील, वैभव पाटील, उदय पाटील, आशिष पाटील, शुभम पाटील, सुधीर पाटील आदींचा समावेश आहे.



विकासाला चालना देणारा पक्ष
मार्गदर्शन करताना माजी मंत्री खडसे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन चालणारा पक्ष असून विकासाला चालना देणारा पक्ष आहे. या पक्षात तुमचे स्वागत करीत असल्याचे ते म्हणाले. यावेळी
राज्य वस्त्रोद्योग महासंघ उपाध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, जि.प.चे माजी गटनेते विनोद तराळ, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, प्रल्हाद महाजन, गोपाळ रघुनाथ पाटील, सुपडाबाई भालेराव, सुधाकर महाजन, ज्ञानेश्वर महाजन, कैलास पाटील, अतुल पाटील, गोपाळ पाटील, एकनाथ प्रधान, संजय धनगर, प्रमोद भालेराव, विशाल पोहेकर, भगवान भील, राजु गायकवाड, सुरेश मोरे, दिनेश गायकवाड, तुकाराम भील उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !