भुसावळातील पालिका संकुलावरील अनधिकृत हॉटेल्स, लॉजसह व्यायामशाळा तोडणार : मुख्याधिकारी संदीप चिद्रवार


भुसावळ : भुसावळ पालिकेत मुख्याधिकारी ठेकेदार असल्याच्या आरोपासह धनदांडग्यांचे अतिक्रमण हटवण्यात आले नसल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी केला होता या आरोपावर मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी स्पष्टीकरण देत आपण ठेकेदार असल्याचे आरोप हास्यास्पद व बिनबुडाचे असल्याचे सांगितले. पालिकेत निविदा प्रक्रिया ऑनलाईन राबवली जाते शिवाय ज्यांची निविदा लोवेस्ट आहेत त्यांनाच काम मिळते, असेही ते म्हणाले.

शहरातील पालिका संकुलातील अतिक्रमण हटवणार
भुसावळातील अतिक्रमण हटवताना नियमानुसारच हटवण्यात आले असून यापुढे शहरातील पालिकेच्या संकुलांमध्ये बेकायदेशीररीत्या बांधण्यात आलेल्या हॉटेल्स, लॉज तसेच व्यायामशाळा सुरूवातीला तोडण्यात येतील, असे पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार म्हणाले. अतिक्रमण हटवण्यापूर्वी संबंधित व्यावसायीकांना नोटीसा बजावण्यात आल्या शिवाय वाहन फिरवून लावूड स्पीकरद्वारे सूचनाही करण्यात आली शिवाय ज्यांचे पक्के अतिक्रमण आहे व जे मोहिमेत निघाले नाही त्याबाबत पुराव्यासह कागदपत्रे दिल्यास निश्चित पालिका कारवाई करेल, असेही मुख्याधिकारी म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !