रावेर शहरातील ब्रह्मवृंद समाजातर्फे सेवानिवृत्तांसह गुणवंतांचा गौरव
रावेर : समस्त ब्रह्मवृंद समाजातर्फे महाशिवरात्रीनिमित्त समाजातील यश मिळवलेल्या सेवानिवृत्तांचा गौरव करण्यात आला. श्री रामस्वामी मठात समाजाचे उपाध्यक्ष अरविंद पाठक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. प्रथम समाजाचे अध्यक्ष प्रकाश मुजूमदार व मंगला मुजुमदार यांच्याहस्ते महाशिवरात्रीनिमित्त भगवान महादेवावर रुद्राभिषेक पूजन करण्यात आले.
यांचा झाला गौरव
यानंतर समाजातील विविध यश व पुरस्कारप्राप्त तसेच सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला. यात शिक्षण संवर्धक संघ चेअरमन प्रकाश मुजूमदार, सहससचिव जयंत कुलकर्णी, संचालक प्रकाश जोशी, शैलेंद्र देशमुख, उमवि आजीवन अध्ययन समिती सदस्य दिलीप वैद्य, दर्पण पत्रकार पुरस्कारप्राप्त प्रदीप वैद्य, सेवानिवृत्त प्रमोद भालेराव, आदर्श शिक्षिका रेखा जोशी व जयश्री कुलकर्णी, शारदा महिला मंडळ अध्यक्षा सुवर्णा भागवत, स्टेट बँक जिल्हा लिगल अॅडव्हायझर भारती मुजुमदार, पतसंस्था लिक्विदेटर राहुल मुजूमदार, दिव्यांग जिल्हाध्यक्ष संजय बुवा, गीता पठाण परीक्षेत यश प्राप्त पदी तेजश्री आठवले यांचा गौरव करण्यात आला तसेच धनंजय उपाध्ये, राजेंद्र उपाध्ये, नितीन पाठक, चंद्रकांत पाठक (कोरोना योद्धा), अबोली मटकरी (बारावीत 90 टक्के गुण), श्रीधर भोकरकर (केमिस्ट मेडिकल असोशियनपदी निवड), पवन वैद्य (सर्वाजनिक बांधकाम विभागात नियुक्ती), मधुकर कुलकर्णी (ज्येष्ठ नागरीक, पुणे) यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी समाजातील महिला, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मुजुमदार, संचालन जयंत , नितीन पाठक व आभार धनंजय उपाध्याय यांनी मानले.


