संतापजनक : अल्पवयीन मुलीवर मंदिरातच अत्याचार


सातारा : राज्यात महिलांसह मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मंदिरासारख्या पवित्र ठिकाणीच नराधम तरुणाने अत्याचार (Rape) केला. ही संतापजनक घटना खंडाळा तालुक्यातील एका गावात सुमारे दोन महिन्यांपूर्वी घडली आहे. याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात (Lonand Police Station) एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठार मारण्याची धमकी देत अत्याचार
खंडाळा तालुक्यातील एका गावातील बारा वर्षांची मुलगी 9 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता दुकानात जात होती. त्यावेळी त्याच गावातील एका तरुणाने तिला बोलावून घेतले. मुलीला धमकी देऊन जवळच असलेल्या मंदिरात नेले. त्यानंतर तिच्यावर त्याने जबरदस्तीने अत्याचार केला. ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुला मारून टाकीन. तसेच तुझ्या घरच्यांना पण मारून टाकीन, अशी धमकी त्या तरुणाने दिली. त्यामुळे पीडित मुलीने हा प्रकार भीतीपोटी कोणालाही सांगितला नाही.



मामीला प्रकार सांगितल्यानंतर घटना उघड
ही घटना घडली त्याच दिवशी संशयीत आरोपी तरुणाच्या वडिलानेही मुलीला ‘तू माझ्या मुलासोबत लग्न कर, अन्यथा तुझ्या वडिलांना व तुझ्या घरातील लोकांना मारून टाकीन,’ अशी धमकी दिली. काही दिवसांपूर्वी पीडित मुलगी तिच्या मामीकडे गेली होती. त्यावेळी तिने हा सारा प्रकार मामीला सांगितला. त्यानंतर मामीने फोनवरून मुलीच्या आईला या प्रकाराची माहिती दिली. मुलीच्या आईने तातडीने लोणंद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पिता-पूत्राविरोधात गुन्हा
पोलिसांनी संबंधित तरुणावर अत्याचार केल्याचा तर त्याच्या वडिलांवर धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. दोघेही बापलेक पोलिसांना सापडले नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने हे अधिक तपास करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !