भुसावळात स्व.बी.सी.बियाणी स्मृती चषक चॅम्पियनशीप : जळगावचा संघ ठरला विजयी


भुसावळ : माहेश्वरी क्रिकेट चॅम्पियनशीप, माहेश्वरी तहसील सभा व माहेश्वरी युवा संगठन भुसावळद्वारा आयोजित बियाणी एजुकेशन ग्रुपद्वारा प्रायोजित स्व.बी.सी.बियाणी स्मृतीचषक माहेश्वरी क्रिकेट चॅम्पियनशीप क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवार, 6 रोजी जामनेर रोडवरील बियाणी मिलिटरी स्कूलच्या मैदानावर करण्यात आले. उद्घाटन बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सेक्रेटरी डॉ.संगीता बियाणी यांच्याहस्ते करण्यात आले. दरम्यान, जळगावचा संघ या स्पर्धेत विजयी ठरला.

यांची होती उपस्थिती
यावेळी जळगाव जिल्ह्यातील वेगळ्या तालुक्यातील माहेश्वरी समाजाचे सहा क्रिकेट संघ स्पर्धेत सहभागासाठी दाखल झाले होते. प्रसंगी विनोद बियाणी, स्मिता बियाणी, रोनक बियाणी, पियुष बियाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत भुसावळ माहेश्वरी तहसील सभा अध्यक्ष प्रवीण भराडिया, सचिव राजेश लढ्ढा, माहेश्वरी युवा संगठन भुसावळ अध्यक्ष मयूर नागौरी, सचिव सर्वेश लाहोटी, प्रोजेक्ट चेअरमन यश हेडा, चेतन भराडीया, राजेश लढ्ढा, श्रीकेश लाहोटी, द्वारकादास हेडा, आकाश काबरा, डॉ.संगीता चांडक, संजय चांडकसह समाज बांधवांची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !