असुविधांमुळे संताप : वरणगावात सेंट्रल बँक मॅनेजरांना भाजपा पदाधिकार्‍यांचा घेराव


वरणगाव : वरणगाव शहराला लागून असलेल्या 28 खेड्यातील खातेदारांचे वरणगावातील सेंट्रल बँकेत खाते आहेत मात्र ग्राहकांना बँकेकडून सुविधा मिळण्याऐवजी अनेक असुविधांचा सामना करावा लागत असल्याने संतप भाजपा पदाधिकार्‍यांनी सेंट्रल बँक मॅनेजर यांना घेराव घालत जाब विचारला. भाजपाच्या या आंदोलनानंतर किमान ग्राहकांना सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.

खातेदारांसह ज्येष्ठांना मोठा मनस्ताप
वरणगावच्या सेंट्रल बँकेत अपूर्ण कर्मचारी वर्गामुळे पेन्शनधारकाां पेन्शन घेण्यासाठी तास न् तास उभे रहावे लागते शिवाय खातेदारांनाही याबाबत असुविधा होत आहे. ज्येष्ठांना बसण्यासाठी देखील जागा नाही, अशी स्थिती आहे. या गंभीर बाबीची आलेल्या तक्रारींची दखल घेत माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपाध्यक्ष सुनील माळी, भाजयुमोचे अध्यक्ष आकाश निमकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष मनीषा पाटील, किसान मोर्चाचे अध्यक्ष ऋषिकेश महाजन, भाजपा सरचिटणीस गोलू राणे, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, शामरावजी धनगर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, भाजयुमो प्रवक्ता आकाश महाजन, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, बळीराम सोनवणे, स्वप्नील पवार, डॉ.नाना चांदणे यांच्यासह भाजपाचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.



सुविधा पुरवण्याचे आश्‍वासन
सेंट्रल बँकेचे मॅनेजर विवेक कुमार गुप्ता यांच्याकडे पदाधिकार्‍यांनी असुविधांबाबत जाब विचारला. वरणगाव शहर व परीसरातील सुशिक्षीत बेरोजगारांना नियमानुसार कर्ज वितरण करावे, मुद्रा लोनचा लाभ मिळावा, ज्येष्ठांना रांगेत उभे राहू न देता त्यांना बसण्यासाठी जागा द्यावी, ज्येष्ठांना रांगेऐवजी थेट बँकेत जावू द्यावे, अपूर्ण कर्मचारी संख्येची दखल घेवून तत्काळ जादा कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी आदी मागण्या करण्यात आली. सेंट्रल बँक मॅनेजर विवेक गुप्ता यांनी ज्येष्ठांना तत्काळ सुविधा देण्यासह बेरोजगारांना कर्ज वितरण नियमानुसार करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले तसेच अपूर्ण कर्मचारी संख्येचा प्रस्ताव तात्काळ विभागीय महाप्रबंधकांकडे पाठवण्याचे आश्‍वासन दिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !