यावल शहरात आता 11 प्रभागातून 23 नगरसेवक निवडून येणार !


Yawal Palika Election यावल : यावल पालिकेत आता नव्या प्रभाग रचनेनुसार 11 प्रभागातून 23 नगरसेवक निवडून येणार आहेत. गुरुवारी प्रभाग रचना प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली. नगरपरिषद सन 2022 मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली. यासंदर्भात नगरपरीषदेच्या क्षेत्रातील नागरिकांसाठी माहिती देण्यासंदर्भात गुरूवारी नगरपरीदेच्या नोटीस बोर्डावर प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

17 मार्चपर्यंत घेता येणार हरकती
या संदर्भात हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी 10 मार्च ते 17 मार्चपर्यंत प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात जमा करण्यास करण्याचे आवाहन मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी
केले आहे. 2011 च्या लोकसंख्येवर आधारीत प्रभाग रचना असून शहराची एकूण लोकसंख्या 36 हजार 706 असून, यात अनुसुचित जातीची लोकसंख्या 2 हजार 775 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 2 हजार460 आहे. दोन सदस्यीय प्रभागांची संख्या 10 असून तीन सदस्यीय प्रभागाची संख्या 1 आहे. दोन सदस्यीय प्रभागाकरीता सरासरी लोकसंख्या तीन हजार 192 आहे. तर तीन सदस्यीय प्रभागा करीता सरासरी लोकसंख्या चार हजार 788 आहे.



महिलांनाही मोठ्या प्रमाणावर संधी मिळणार
निवडून द्यावयाच्या एकूण 23 सदस्यांमध्ये अनुसूचित जाती व जमातीकरीता प्रत्येकी दोन सदस्य यात प्रत्येकी एक पुरुष व एक महिला सदस्य राखीव आहेत. या सह दहा महिला सदस्यांसाठी राखीव असून यामुळे एकूण 12 महिला सदस्य पालिकेत निवडून येणार आहेत. 9 जागा अनारक्षित आहेत. म्हणजेच एकूण 23 पैकी 12 महिला सदस्यांमध्ये अनुसूचित जाती, जमातीसाठी प्रत्येकी एक सदस्य, व दहा सर्वसाधारण जागा महिलांसाठी राखीव आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !