भुसावळात मुख्य वाहिनीला गळती : एक दिवस उशिराने होणार पाणीपुरवठा
भुसावळ : पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावरून नाहाटा चौफुलीवरील जलकुंभाला पाणीपुरवठा करणारी 500 मिलीमीटर व्यासाची राईझिंग मेन लाईनवर लिकेचे वाढल्याने पालिकेतर्फे युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे परीणाम शहरातील दक्षिण भागाचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने होणार असल्याचे पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी कळवले आहे. नागरीकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


