श्री खंडोबा यात्रोत्सव कायद्याचे व्हावे पालन : प्रांताधिकारी कैलास कडलग


फैजपूर : आगामी होळी पौर्णिमेपासून सुरू होणारी श्री खंडोबा देवस्थानचा यात्रा, महोत्सव कोरोना नियमांसह कायद्याचे पालन करून साजरा करावा, असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी केले. पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनीही नियमांचे पालन करून कायदा-सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, खंडोबा देवस्थानचे गादिपती महामंडलेश्वर श्री श्री पुरुषोत्तमदासजी महाराज, फैजपूर पालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, सहा.पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, पोलिस उपनिरीक्षक मकसुद्दीन शेख,, उपनिरीक्षक मोहन लोखंडे, वीज वितरण कंपनीचे फैजपूर शाखा सहाय्यक अभियंता विनोद सरोदे हे उपस्थित होते.



सदस्यांनी व्यक्त केले मनोगत
शांतता समिती सदस्य संजय सराफ, माजी नगरसेवक केतन किरगे, शेख कुर्बान, माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघूळदे, महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज यांनी यात्रा महोत्सवातील खबरदारीच्या विषयांवर मनोगत व्यक्त केले. बैठकीला फैजपूर मंडळ अधिकारी हनीफ तडवी, तलाठी तेजस पाटील, जिल्हा दूध संघ संचालक हेमराज चौधरी, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, माजी नगरसेवक शेख जफर, माजी नगरसेवक अमोल निंबाळे, माजी नगरसेवक संजय रल, भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, काँग्रेस शहराध्यक्ष शेख रियाज,युवक शहराध्यक्ष वसीम तडवी, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष वैभव वकारे, काँग्रेेस जिल्हा सरचिटणीस रामा मोरे, रवींद्र होले,सादिक शेख, शेख शाकिर, शेख उस्मान, रामाराव मोरे, नरेंद्र चौधरी, भाजपा आदिवासी सेल शहर अध्यक्ष रशिद तडवी, वैभव वकारे पवन दास यादव, नरेंद्र चौधरी, पत्रकार वासुदेव सरोदे, अरुण होले, समीर तडवी, उमाकांत पाटील, शेख फारुख सह आदी विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे यांनी तर आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !