जळगावात कापड दुकानांना भीषण आग ; लाखो रुपयांचे नुकसान


जळगाव : कापड दुकानांना शॉर्ट सर्कीटमुळे मोठ्या प्रमाणावर आग लागल्याने केळकर मार्केटजवळील अनेक दुकाने जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. रात्री उशिरा अग्निशमन बंबाच्या पथकाकडून आग विझविण्यात यश आले.

शॉर्ट सर्कीटमुळे मोठ्या प्रमाणावर आग
जळगाव शहरातील केळकर मार्केटजवळील गणेश मार्केटमधील कापड दुकानांना शुक्रवार, ११ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटमुळे अचानक आग लागली. यात मार्केटमधील राजेश मोतीरामानी व गिरीश मोतीरामानी यांचे सारीका साडीया, सारीका टॉप, सारीका टेक्सटाईल दुकानात कापड, साडी व लेडीज ड्रेस यांना मोठ्या प्रमाणावर आग लागली. यामध्ये लाखो रूपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. यावेळी महापालिकेचे अग्निशमन विभागाचे तीन बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी साधारणपणे गणेश मार्केट हे तीन मजली आल्याने आगीचे लोळ हे तिसऱ्या मजल्यापर्यंत जात होते.



व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका
ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मार्केटमधील व्यापाऱ्यांचा होलसेलचा व्यवसाय असल्यामुळे दुकानाच्या बाहेर मालाचे गठ्ठे ठेवले होते. या गठ्ठे देखीलजळून खाक झाली आहे. या आगीचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !