सरकारी वकील प्रवीण चव्हाणांनी आरोप फेटाळले ; म्हणाले ‘स्टींग’मागे जळगाव कनेक्शन उघड ; जाणून घ्या नेमकी बातमी


मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे सव्वाशे तासांचे रेकॉर्डींग असलेला पेन ड्राईव्ह उपाध्यक्षांकडे सोपवला होता शिवाय या पेन ड्राईव्हमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या काही वरीष्ठ नेत्यांना अडकवण्यात येत असल्याबाबत कट रचण्यात आल्याचा आरोपही केल्याने राज्यात या प्रकारानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान, जळगावातील तेजस मोरे या तरुणाने भेट म्हणून दिलेल्या घडाळ्यातील छुप्या कॅमेर्‍यातून आपले स्टींग करण्यात आल्याचा दावा विशेष सरकारी वकील अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांनी केला आहे. यातील व्हिडीओ मॉर्फ करून बदलण्यात आल्याचा दावादेखील त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.

सरकारी वकील चव्हाणांनी केले आरोपांचे खंडण
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत मोठा गौप्यस्फोट करत सव्वाशे तासांचे स्टींग ऑपरेशन सादर करून खळबळ उडवून दिली. या प्रकरणाने उडालेली खळबळ अजून देखील शांत झालेली नाही. या प्रकरणी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा वार्तालाप दर्शविण्यात आला होता. यावर प्रवीण चव्हाण यांनी तात्काळ आपल्यांवरील आरोपांचे खंडण केले. यानंतर प्रवीण चव्हाण यांनी एबीपी-माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे स्टींग नेमके कसे झाले याची माहिती दिली.



घड्याळात लावला छुपा कॅमेरा
सरकारी वकील प्रवीण चव्हाण म्हणाले की, माझ्या पुणे येथील कार्यालयात तेजस मोरे या तरुणाने आपल्याला एक घड्याळ भेट दिले होते. हे घड्याळ आपण कार्यालयात लावले होते. यातील छुप्या कॅमेर्‍यातून आपले स्टींग करण्यात आले. मात्र यात आपण कुणाचेही नाव घेतलेलेच नाही तर हे व्हिडीओ एडीट करण्यात आलेले आहे. यात माझ्या तोंडी नसणारी वाक्ये यात टाकण्यात आलेली आहेत.

चित्रीकरणात नसलेला आवाज टाकण्यात आला
या संदर्भात प्रवीण चव्हाण म्हणाले की, माझ्या चित्रीकरणात नसलेला आवाज यात टाकण्यात आलेला आहे. यामुळे हे व्हिडीओ पूर्णपणे एडिट करून तयार करण्यात आलेले आहेत. हे घड्याळ आपल्याला भेट म्हणून देणारा व्यक्ती तेजस मोरे असून तो जळगाव येथील असल्याची माहिती देखील प्रवीण चव्हाण यांनी याप्रसंगी दिली तर या प्रकरणाच्या सखोल चौकशीतून सत्य समोर येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

स्टींग प्रकरणात ‘जळगाव कनेक्शन’ उघड
तेजस मोरे हा एका जामीनाच्या संदर्भात आपल्याकडे आला होता. त्याने आपल्याला विविध वस्तू देण्याचे सुचविले होते. यानंतर त्याने आपल्याला घड्याळ भेट दिले आणि ते अखेर आपण ऑफीसच्या भिंतीवर लावले. यातूनच आपले चित्रीकरण करून यातील व्हिडीओ एडीट करण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला. दरम्यान, तो जळगावचा असल्याने या प्रकरणात जळगावचे कनेक्शन असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. तर तेजस मोरे याच्या सोबत चाचू नावाची व्यक्ती होता अशी माहिती देखील त्यांनी याप्रसंगी दिली. दरम्यान, प्रवीण चव्हाण यांच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.

 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !