धक्कादायक ! : परभणीतील एस.टी.चालकाची विहिरीत उडी घेवून आत्महत्या


ST Worker Suside परभणी : सुमारे तीन महिन्यानंतरही एस.टी.संपाचा तिढा सुटत नसताना परभणीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. परभणीतील एस.टी.चालक मुजफ्फर खान जाफर खान यांनी विहिरीत उडी घेवून आत्महत्या (ST Worker Suside) केली आहे. खान यांच्या आत्महत्येनंतर परभणीतील एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. मयत खान यांचा मृतदेह परभणी आगारात आणण्यासाठी एसटी कर्मचार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

विषारी द्रव प्राशन करून विहिरीत घेतली उडी
परभणीच्या जिंतूर आगारातील बस चालक मुजफ्फर खान जाफर खान हे काल दुपारी चार वाजता जिंतूर बस स्थानकावरून निघाले होते. याच दरम्यान त्यांनी विषारी द्रव्य प्राषण करून भोगाव शिवारातील गोमा खिल्लारे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेतली. ही बाब आज उघडकीस आल्यानंतर त्यांचा मृतदेह जिंतूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तेथे एसटी कर्मचारी दाखल झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिवाय मयत खान यांचा मृतदेह एसटी आगारात नेण्यासाठी आग्रह धरला. परंतु, पोलिसांनी मृतदेह हलवू दिला नाही. यावेळी एसटीचे विभागीय नियंत्रक जोशी यांनी या आंदोलक कर्मचार्‍यांना शांत करून त्यांना खान यांच्या कुटुंबाला न्याय देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलक शांत झाले.



आणखी किती बळी घेणार सरकार ?
दरम्यान, एसटीच्या विलीनीकरणासाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी अजूनही आंदोलन करत आहेत. परंतु, सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नसल्यामुळे अशाप्रकारे चालक-वाहक कर्मचारी आपली जीवनयात्रा संपवत आहेत. त्यामुळे सरकार अजून किती बळी घेणार? असा प्रश्न जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी उपस्थित केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !