भुसावळ शहर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शरद सोनवणे
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती शहरात उत्साहात साजरी होणार
भुसावळ : भुसावळ शहरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. या अनुषंगाने शहरातील शासकीय विश्रामगृहात शनिवारी दुपारी 12 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते शरद सोनवणे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी आरपीआय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे होते. यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, पीआरपी महाराष्ट्र उपाध्यक्ष जगन सोनवणे, माजी नगरसेवक रवी सपकाळे, माजी नगरसेवक संतोष बारसे आदींची उपस्थिती होती.
नियमांचे पालन करून जयंती साजरी करण्याचे आवाहन
आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी म्हणाले की, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती समाजबांधव व इतर घटकांना सोबत घेवून जल्लोषात साजरी करावी. जयंतीनिमित्त सामाजिक व जनहितार्थ उपक्रम राबवावेत, असेही ते म्हणाले.


यांची होती उपस्थिती
यावेळी लक्ष्मण जाधव, रवी निकम, सुदाम सोनवणे, बाळू सोनवणे, प्रकाश सोनवणे, पप्पू सुरडकर, विश्वास खरात, उल्हास पगारे, प्रकाश तायडे, सुनील ढिवरे, दिलीप मोरे, महेंद्र सोनवणे, बाळा पवार, संतोष भगत, संतोष साळवे, गोरखनाथ सुरवाडे, नरेश गडवे, बंडू देशमुख, शरद जवरे, विशाल घायतडफ, शुभम साळुंखे, शरद दाभाडे, रुपेश साळुंखे, विजय मोरे, विजय दाभाडे, प्रमोद निकम, अन्वर भाई, सरजू तायडे, युवराज नरवाडे, रवी दाभाडे, सुरेश वानखेडे, राहुर आराफ, रवी तांबे, राहुल भालेराव, गजानन निंबाळकर, भीमराव वाघ, छोटेलाल हरणे, सुनील ढिवरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पप्पू सुरडकर तर आभार सुनील ढिवरे यांनी मानले.
