विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या नोटीस वरणगावात भाजपाने केली होळी

भाजपा नेत्यांना त्रास देणे बंद न केल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही ः माजी नगराध्यक्ष सुनिल काळे


वरणगाव : महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र डणवीस यांना पोलिस प्रशासनाने 160 ची नोटीस देउन लोकशाहीत विरोधकांचा आवाज दडपण्याचे काम सुरू केल्याच्या निषेधार्थ रविवारी सकाळी वरणगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने बसस्थानक चौकात पोलिसांनी दिलेल्या नोटीसची होळी करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीच्या विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.

फडणवीस महाविकास आघाडी सरकारचा कर्दनकाळ
माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडीचा कर्दनकाळ आहेत. महाविकास आघाडीने यापुढे भाजप नेत्यांना त्रास देणे बंद न केल्यास भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सत्ताधारी मंत्र्यांना रस्त्यावर सुद्धा फिरकू देणार नाही.



यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, शहराध्यक्ष आकाश निमकर, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, शामराव धनगर, सुधाकर चौधरी, पप्पू ठाकरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा पाटील, वरणगाव शहराध्यक्ष प्रणिता पाटील-चौधरी, के.के.अंभोरे, गोलू वंजारी, संदीप माळी, डॉ.नाना चांदणे, अंकुश साबळे, आकाश महाजन, नरेंद्र बावणे, छोटू सेवातकर, गंभीर माळी, बाळू धनगर, भरत चंदने, रामभाऊ माळी, स्वप्नील पवार. मुस्लिम भाई अन्सारी, शहराध्यक्ष डी.के.खाटीक, कस्तुराबाई इंगळे आदी उपस्थित होत्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !