चोरट्यांची सलामी : धुळ्यात महिला पोलिसाच्या घरातूनच 60 हजारांचा मुद्देमाल लांबवला
धुळे : चोरट्यांनी थेट महिला पोलिसाच्या घरातून ऐवज लांबवल्याने खळबळ उडाली. पोलिस अधिक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या वंदना जगदीश सोनार (Wandana Jagdish Sonar) या पोलिस वसाहतीत ब्लॉक नं. 35, रुम नं 409 या ठिकाणी राहतात. चोरट्यांनी महिला कर्मचार्याच्या घरातून चोरट्यांनी रोख रक्कम, दागिने व ऐवज असा 60 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याने खळबळ उडाली.
पोलिसांकडून चोरट्यांचा शोध
वंदन सोनार (Wandana Jagdish Sonar) या नेहमीप्रमाणे सकाळी घराबाहेर पडल्या. त्यानंतर चोरटा घरामागील भिंत ओलांडून घरात शिरला. त्यानंतर 32 हजारांची रोकड, 15 हजारांचे टोंगल, 12 हजारांची कर्णफुले, एक हजारांची चांदी, तसेच जुने चांदीचे नाणे लांबवण्यात आले. पोलिसांनी आता चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.


