फडणवीसांनी स्पष्ट शब्दातच सांगितले ; होय ‘एफबीआय’ काढले ; जाणून घ्या नेमकी बातमी


मुंबई : पेन ड्राईव्ह स्टींग प्रकरणात टोला लगावताना दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीसांनी डिटेक्टिव्ह एजन्सी काढलीय का? असा खोचक प्रश्न विचारल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्र्यांना खरमरीत प्रत्युत्तर दिले. गृहमंत्र्यांना सांगा की मी एक एफबीआय काढलाय. फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, असं तिचे नाव आहे, असे फडणवीस म्हणाले.

गृहमंत्र्यांच्या चिमट्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांचे मजेशीर उत्तर
विधानसभेत फडणवीसांनी सादर केलेल्या पेन ड्राईव्हबाबाती सीआयडी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. तसेच फडणवीस यांनी डिटेक्टिव्ह एजन्सी उघडली आहे का, असा चिमटा काढला. याबाबत पत्रकार परीषदेत विचारले असता फडणवीस म्हणाले की, गृहमंत्र्यांना सांगा की, मी एक एफबीआय काढलाय. फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेश. हे विरोधी पक्षनेत्याचं कामच आहे. विरोधी पक्षनेत्याकडे शोषित, वंचित, पीडित असे सगळे लोक पुरावे आणून देत असतात. त्यांना अपेक्षा असते की, सरकारकडून जिथे अन्याय होतोय तिथे आपल्याला विरोध पक्षनेता न्याय मिळवून देईल. म्हणून आमच्याकडे या गोष्टी येत असतात. अजूनही येतील. मला त्या मांडाव्याच लागतील. त्या मी मांडणारच, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !