वरणगावात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य दुचाकी रॅली निघणार

शिवसेनेच्या बैठकीत निर्णय ; विविध कार्यक्रमांचे होणार आयोजन


वरणगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती 21 मार्च रोजी साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने रविवारी सायंकाळी शिवसेनेची बैठक शहर कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत सायंकाळी पाचा वाजता दुचाकी कल रॅली काढण्यास विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचे ठरले.

यांची बैठकीला उपस्थिती
बसस्थानक रस्त्यावरील शिवसेना शहर कार्यालयात रविवारी सायंकाळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसैनिक यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा संघटक विलास मुळे, उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, अल्पसंख्यांक समाजाचे नेते हिप्पी शेठ, शहरप्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर, अल्पसंख्यांक संघटक सईद मुल्लाजी, तालुका संघटक मोहसीन खान, माजी उप शहरप्रमुख सुनील भोई, संजू कोळी, उपशहर प्रमुख सुखदेव धनगर, अशोक शर्मा, शेख अझहर, शहर संघटक पंकज चौधरी, शहर समन्वयक अमोल सोनार, बाळा माळी, आबा सोनार, किरण माळी, गोविंदा चौधरी, रुपेश ठाकूर, वसीम शहा, राहुल वंजारी, शाहरुख पठाण, दीपक बढे, मनोज देवगिरीकर, आरिफ मन्यार, सागर माळी, पवन चौधरी, अजय सोनार, दिपक शेळके, सागर वंजारी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुचाकी रॅलीत शहरातील शिवप्रेमी युवकांनी तसेच विविध संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शहरप्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर यांनी या बैठकीत केले.



दुचाकी रॅलीचा असा आहे मार्ग
21 सायंकाळी पाच वाजता सिद्धेश्वरनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शासकीय विश्रामगृह येथून दुचाकी रॅलीला सुरुवात होईल. जिल्हाप्रमुख समाधान महाजन हे भगवा झेंडा उंचावून रॅलीचा शुभारंभ करतील. नंतर बस स्टॅन्ड रोड, भाजी मार्केट, मोठी होळी, चौधरी वाडा, बढे वाडा, मोठा माळी वाडा, गांधी चौक, न.पा.मार्गे नदी पात्रात रॅलीचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप होईल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !